दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २२ नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. मागच्या 24 तासांमध्ये विदर्भात कडाक्याच्या थंडीची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोकण वगळता महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढचे चार दिवस 4 ते 6 डिग्रीपर्यंत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
काही जिल्ह्यांमध्ये 6 डिग्रीहून अधिक तापमान पुढच्या 48 तासांत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वेटर, शेकोटीने काही होणार नाही आता हिटरच मागवावा लागणार की काय असं वाटू शकतं. महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. डिसेंबरला महाराष्ट्रात तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. यावेळी ला निनाचा परिणाम भारतावर दिसून येणार आहे.
विदर्भातील नागपूर शहरात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत तापमानात घट कायम आहे. तसेच इतरही जिल्ह्यांत सकाळी आणि रात्रीच्या वेळी अधिक गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
18 नोव्हेंबर रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात धुळे, नाशिक, जळगाव छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करावा. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.
फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत मुंबईसह महाराष्ट्रात यंदा थंडी जास्त असल्याचंही सांगितलं जात आहे. दक्षिण पूर्ण पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. 22 तारखेला पश्चिम बंगालच्या खाडीत पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
