पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 25 ते 30 सप्टेंबर या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस मोठ्या प्रमाणात वाढेल. मागच्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामानातील बदलांमुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून, यामुळे मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे.
advertisement
डॉ. सुप्रीत यांनी दिली महत्त्वाची अपडेट
या आठवड्यात, विशेषतः वीकेंडला, पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
डॉ. सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे पाच दिवस हवामान कसं राहणार आहे जाणून घेऊया.
25 सप्टेंबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
26 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी
27 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर
28 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर,
29 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, ठाणे, मुंबई
30 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, ठाणे, मुंबई