मिळालेल्या माहितीनुसार, सटाणा तालुक्यातील अंतापूर- ताहाराबाद मार्गांवर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव पिकअप आणि टाटाच्या कारचा भीषण अपघात झाला. या या अपघातात तीन जणांचा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्याा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. स्थानिकांनी जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले. मदतकार्य सुरू आहे.या अपघातामुळे वाहतूक काही विस्कळीत झाली.
मजुरांना घेऊन चालली होती पिकअप व्हॅन
अधिक माहिती अशी की, सटाण्याजवळ ताहाराबाद - आंतापुर मार्गांवर मजुरांना घेऊन जाणारी पिकअप आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले त्यांना शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.