दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवारांनी बंगळुरूत तक्रार नोंदवल्यानंतर ‘झीरो एफआयआर’ दाखल करण्यात आली. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यामुळे ही तक्रार इतर राज्यात नोंदवण्याचा सल्ला राहुल गांधींनी दिल्यानंतर रोहित पवारांनी बंगळुरूत जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर कर्नाटकच्या डीजीपींनी झीरो एफआयआर महाराष्ट्राच्या डीजीपींकडे वर्ग केलाय. अपघात बारामती परिसरात घडल्यानं बारामती ग्रामीण पोलिसांकडे तपासासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.
advertisement
एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप
दरम्यान, एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड नसून "मोठा गुन्हेगारी कट" असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला
झीरो एफआयआर म्हणजे काय?
झीरो एफआयआर म्हणजे गुन्हा ज्या ठिकाणी घडला आहे. त्या हद्दीत नसलेल्या पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवण्याची सुविधा असते. अशा एफआयआरला ‘0’ क्रमांक दिला जातो आणि नंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे तो वर्ग केला जातो.
विमान अपघातानंतर बारामती पोलिसांकडे अपघाती मृ्त्यूची नोंद करण्यात आली होती. बंगळुरूतील झीरो एफआयआर बारामती पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर आता तपासात काय समोर येतं, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
