TRENDING:

Nitin Gadkari:'...तेंव्हा प्रचाराला गेलो तर आमच्यावर दगडं फेकायचे', नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा

Last Updated:

1977 साली जनता पार्टीची माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक होती. त्या काळात संघ आणि भाजपबद्दल किती द्वेष होता ते दिसून आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: "1977 साली जनता पार्टीची माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक होती. त्या काळात संघ आणि भाजपबद्दल किती द्वेष होता ते दिसून आलं. काँग्रेसकडून भाजपविरोधात द्वेष पसरविला जात होता. आम्ही ज्या भागात भोंगे लावून प्रचार करायचो तेव्हा त्यावर दगड मारली जायची पळवून लावलं जायचं' असा किस्सा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला.
News18
News18
advertisement

नागपूर वनमती सभागृह एका पुस्तकात प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काय घडलं होतं, या आठवणींना उजाळा दिला.

महात्मा गांधी यांच्या हत्तेनंतर 'तरुण भारत'वर मोठं संकट आलं होतं. आणीबाणीच्या काळात सुद्धा तरुण भारत वर संकट होतं. मात्र तरुण भारतने वैचारिक दृष्टीने संघर्ष केला. 1977 साली जनता पार्टीची माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक होती. त्या काळात संघ आणि भाजपबद्दल किती द्वेष होता ते दिसून आलं. काँग्रेसकडून भाजपविरोधात द्वेष पसरविला जात होता. आम्ही ज्या भागात भोंगे लावून प्रचार करायचो तेव्हा त्यावर दगड मारली जायची पळवून लावलं जायचं' असं यावेळी गडकरी म्हणाले.

advertisement

तसंच, 'आणिबाणीच्या काळात अनेकांना जेलमध्ये जावं लागलं पण, तरुण भारत वैचारिक दृष्ट्या यश मिळवत होत आपले विचार सोडले नाही. तरुण भारताचा अग्रलेख त्याचा विरोध करणारे सुद्धा वाचायचे. आजचा काळ वेगळा आहे त्या काळासोबत आजची तुलना होऊ शकत नाही. त्याकाळात आर्थिक स्थिती चांगली नव्हती, द्वेष संघाचा विरोधात होता. संघावर मोर्चे यायचे, घरावर गोटे फेकले जायचे. काळाच्या ओघात वैचारिक दृष्ट्या सुरू झालेलं तरुण भारत हे वृत्तपत्र होतं. त्याकाळी चे वैचारिक संस्कार झाले त्यातून राष्ट्रभक्ती दिसून आली' असंही ते म्हणाले.

advertisement

'पूर्व नागपुरात आम्ही त्या काळी प्रचाराला जायचो तेव्हा तिथे आम्हाला गोटे मारले जायचे, आज तिथे अनेक कार्यकर्ते मी गेल्यावर उपस्थित असतात स्वागत करतात' असंही गडकरींनी आवर्जून सांगितलं.

'तरुण भारतने कठीण काळात संघर्ष केला त्याचा फायदा आमच्या पार्टीला संगठानेला मिळालं हे यश त्याकाळी कठीण परिश्रम करणाऱ्याचं आहे. तरुण भारतची बॅलन्स शीट कधीच प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. हे मला वाटायचं पण ते सुद्धा तरुण भारत ने करून दाखवलं' असं म्हणत गडकरींनी भाजपचं मुखपत्र तरुण भारत दैनिकाचं कौतुक केलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitin Gadkari:'...तेंव्हा प्रचाराला गेलो तर आमच्यावर दगडं फेकायचे', नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल