TRENDING:

Nashik Munciple Corporation: कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये अग्निशमन दलामध्ये नोकरभरती; आजच करा अर्ज

Last Updated:

Nashik Firebrigade Job: नाशिक मध्ये 1994 नंतर प्रथमच महापालिकेत 246 पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी सध्या दिली आहे. यात स्टेशन ऑफिसर, सब ऑफिसर, चालक,यंत्रचालक, फायरमन यांची भरती करण्यात येणार असल्याचे पत्र मनपा प्रशासनाला राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक मध्ये 1994 च्या  काळा नंतर प्रथमच महापालिकेत 246 पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी सध्या दिली आहे. यात स्टेशन ऑफिसर, सब ऑफिसर, चालक,यंत्रचालक, फायरमन यांची भरती करण्यात येणार असल्याचे पत्र मनपा प्रशासनाला राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहे.
३१ वर्षांनंतर आता होणार ही भरती.
३१ वर्षांनंतर आता होणार ही भरती.
advertisement

नाशिक मध्ये वाढत्या शहराचे क्षेत्रफळ 267 चौरस मीटर असून, लोकसंख्या अंदाजे 25 लाख आहे. शहराची वाढ होत असताना दुसरीकडे आगीचे धोकेही वाढले आहेत. त्यामुळे आग अथवा अपघात प्रसंगी नागरिकांना घटनास्थळी त्वरित अग्निशमन विभागाची मदत घ्यावी लागते. नागरिकांचे सौरक्षणा व मालमत्तेचे रक्षण करावे लागते. सद्यस्थितीत या विभागातील 80 टक्के कर्मचारी हे 52 वयाच्या पुढे असून, अनेक कर्मचारी एक ते दोन वर्षांत सेवानिवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भरती करणे गरजेचे होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एकूण 529 पदे शासनाने मंजूर केलेली आहेत. मात्र सध्या प्रत्यक्षात फक्त 1010 कर्मचारी कार्यरत असून, तब्बल 428 पदे रिक्त आहेत. यामुळे संपूर्ण विभागावर ताण निर्माण झाला होता.

advertisement

या पार्श्वभूमीवर 246 अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्याची मागणी मनपाने शासनाकडे मांडली  होती. मागील दीड वर्षापासून ही भरती रखडल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाला विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

advertisement

शहराचा प्रचंड विस्तार, उंच इमारतींचे वाढते बांधकाम, औद्योगिक परिसरात वाढणारी आग-अपघातांची प्रकरणे आणि आगामी सिंहस्थाच्या काळातील लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन या सगळ्यांचा विचार करता दलाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यावश्यक होते. महापालिकेने यापूर्वीही शासनाकडे या भरतीची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. मात्र आता शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. अग्निशमन विभागाचे सध्या फक्त 1010 मनुष्यबळावर काम सुरू आहे.

advertisement

अशी होणार  नवीन कार्यकारण भरती- 

  • स्टेशन कार्यालय - एकूण 3 
  • advertisement

  • सब ऑफिस- एकूण 9 
  • यंत्रचालक - एकूण 36
  • फायरमन - एकूण 198 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

अशी भरती ही नाशिक शहरासाठी होणार असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागण्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Munciple Corporation: कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये अग्निशमन दलामध्ये नोकरभरती; आजच करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल