TRENDING:

Video: दानवेंनंतर शेकापच्या चित्रलेखा पाटलांचा व्हिडीओ बॉम्ब, महेंद्र दळवी-गोगावलेंकडे पैशांची बॅग

Last Updated:

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केलेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायगड: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बनंतर आता आणखी एका मंत्र्याचं प्रकरण समोर आलं आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.
News18
News18
advertisement

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केलेत. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी यावेळी आपली पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितले की, सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत. मागच्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यांनी 50 खोके’ म्हटलं तर कॅशबोम्ब वाल्यांची बायको माझ्यावर धावत आली.

advertisement

राजकारणात मोठी खळबळ 

पुढे त्यांनी आरोप केला की एका ठाकूर बांधवांच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला मारहाण देखील या मंडळींनी केली आहे.यानंतर अधिक खळबळ उडवत त्यांनी भरत गोगावले यांच्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा व्हिडिओ देखील फोटोसहित दाखवत मोठी खळबळ उडवून दिलीय. भरतशेठ गोगावले कॅश बॉम्ब नंबर २... हे चीटर आमदार आहेत, याविषयी कायम सुनील तटकरे बोलत आले आहेत. आमच्या मतदारसंघात सगळीकडे विकासकमे अर्धवट आहे. कंत्राटदर आमदाराच्या कमिशनमुळे दबले आहेत, असे देखील चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

advertisement

दळवींनी आरोप फेटाळले 

खोटा व्हिडिओ दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रकार सुरु असल्याचं महेंद्र दळवी म्हणाले आहेत. तर खोटा व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी अंबादास दानवेंनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठवलीय असं देखील दळवींनी सांगितलं आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा एक व्हिडीओ शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी व्हायरल केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पैशांचे बंडल दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. त्यानंतर दळवींनी खुलासा करत आरोप फेटाळले आहेत.

advertisement

व्हिडीओ बॉम्बमुळे रायगडचं राजकारण चांगलंच पेटल्याचं दिसतंय. रायगडच्या महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षात या व्हिडीओमुळे नवी ठिणगी पडली आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्यात.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, राजकारण तापलं; सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: दानवेंनंतर शेकापच्या चित्रलेखा पाटलांचा व्हिडीओ बॉम्ब, महेंद्र दळवी-गोगावलेंकडे पैशांची बॅग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल