TRENDING:

गावात शिवीगाळ केली तर थेट ५०० रूपये दंड, कोळगावच्या महिलांचा ऐतिहासिक निर्णय

Last Updated:

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी गावच्या सामाजिक शिस्तीसाठी अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्यानगर:  गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक वादात आई-बहिणीचा उद्धार करून शिवीगाळ करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. जो कोणी शिवी देईल, त्या संबंधित व्यक्तीला ५०० रुपये दंड ठोठावण्याचा ऐतिहासिक ठराव घेण्यात आला आहे.
कोळगाव ग्रामपंचायत
कोळगाव ग्रामपंचायत
advertisement

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी गावच्या सामाजिक शिस्तीसाठी अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. सभेच्या सुरुवातीला शेती क्षेत्रात आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. सभेचे अध्यक्षपद ज्येष्ठ अंगणवाडी सेविका श्रीमती शकुंतला देशमुख यांनी भूषविले.

advertisement

महिला सक्षमीकरणासाठी केवळ घोषणा नकोत, तर ठोस कृतीची गरज आहे. पुढील वर्षी हा सण अधिक व्यापक स्वरुपात साजरा केला जाणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देताना सांगितले.

आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड

स्वच्छतेबाबत कडक भूमिका घेताना ग्रामसभेने गावातील प्रत्येकाने आपले घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे. ज्याच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा आढळेल, त्याला १०० रूपये दंड केला जाणार असल्याचा ठराव घेण्यात आला. तसेच एकमेकांच्या वादात आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्याचा ऐतिहासिक ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

advertisement

व्यसनमु्क्तीसाठी महिलांनी संघटित होण्याची गरज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत रमले नाही मन, तरुणाने सुरू केला भंगार गोळा करून व्यवसाय, 3 कोटी उलाढाल
सर्व पहा

ग्रामसभेच्या अध्यक्ष श्रीमती शकुंतला देशमुख यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीने महिलांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार मानले आणि व्यसनमुक्तीसाठी महिलांनी संघटित होण्याचे आवाहन केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावात शिवीगाळ केली तर थेट ५०० रूपये दंड, कोळगावच्या महिलांचा ऐतिहासिक निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल