TRENDING:

Ahmednagar Crime : सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याला आला राग; ग्राहकाच्या डोक्यात घातला कोयता

Last Updated:

Ahmednagar Crime : सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याने ग्राहकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, 18 सप्टेंबर (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : भाजीपाला असो की फळांची खरेदी बहुतेक लोक तोलभाव (बार्गेनिंग) करताना पाहायला मिळतात. अनेकदा व्यवहार जुळतात तर काही वेळा दोघांची सहमती मिळत नाही. अशावेळी ग्राहक आणि विक्रेता आपापल्या मार्गाने पुढे जातात. मात्र, नगर जिल्ह्यात अशाच प्रकरणातून विक्रेताने ग्राहकावर थेट कोयत्याने हल्ला केला. फळ विक्रेत्यास फळांचे भाव कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने हा प्रकार घडला. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर फळविक्रेत्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक केली आहे.
सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याला आला राग
सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याला आला राग
advertisement

काय आहे प्रकरण?

श्रीगोंदा शहरात प्रेमदास उबाळे हे फळे घेण्यासाठी गेले असता त्यांनी रस्त्याच्या कडेला हातगाडीवर फळ विक्रेते अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान यांच्याकडे फळाच्या भावाची विचारणा केली. सफरचंद विकत घेताना फळविक्रेत्याला सफरचंद बारीक आहेत. भाव व्यवस्थित लावून दे असे उबाळे म्हणाले. याचा राग आल्याने तिघांनी उबाळे यांच्यावर नारळ फोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात उबाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

advertisement

वाचा - तरुणीने वरळी सी लिंकवर पळवली बुलेट; पोलिसांनी आडवताच 'पिस्तूल' काढला अन्..

अपघाताचा बनाव करत 30 लाखांचा लसूण परस्पर विकला

जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. वाहनचालकानं अपघाताचा बनाव करून परस्पर तब्बल तीस लाखांचा लसूण विकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून सर्व मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील एस. एस. ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. ज्या कंपनीकडून लसूण, कांदा व इतर माल खरेदी, विक्री केला जातो. दरम्यान या कंपनीनं सिद्धिकी ब्रदर्स या कंपनीकडून 22,160 किलो लसूण खरेदी केला होता. ज्याची किंमत बाजारभावानुसार तब्बल 29,91,600 रुपये इतकी आहे. हा लसूण मध्यप्रदेशमधील निमजवरून बंगळुरूला पाठवण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar Crime : सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याला आला राग; ग्राहकाच्या डोक्यात घातला कोयता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल