Mumbai News: 26 वर्षीय तरुणीने वरळी सी लिंकवर पळवली बुलेट; पोलिसांनी आडवताच 'पिस्तूल' काढला अन्..

Last Updated:

पोलिसांनी तिला आपल्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं, तेव्हा तिने पिस्तुलाच्या आकाराची वस्तू काढून पोलिसांना म्हटलं, की ती गोळी घालू शकते

पोलिसांनी तरुणीला अटक केली (प्रतिकात्मक फोटो)
पोलिसांनी तरुणीला अटक केली (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई 18 सप्टेंबर : दुचाकींना परवानगी नसलेल्या वरळी सी-लिंकवर हेल्मेटशिवाय बुलेट चालवून मजा घेत असलेल्या 26 वर्षीय तरुणीला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. पोलिसांनी तिच्याकडे परवाना आणि वाहनाची कागदपत्रे मागताच या तरुणीने पिस्तुलाच्या आकाराचा सिगारेट लायटर पोलीस कर्मचार्‍यांकडे दाखवत धमकी दिली. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे राहणारी नुपूर पटेल ही पुण्यात आपल्या भावाला भेटण्यासाठी जात होती. मात्र, वरळी सी-लिंक पाहण्याची इच्छा असलेल्या नुपूरने मुंबईला जाण्यासाठी तिच्या भावाची दुचाकी घेतली.
प्रवास सुरू करण्यापूर्वी तिला सी लिंकवर दुचाकींना परवानगी नसल्याचं माहीत नव्हतं. मात्र, सी लिंकच्या प्रवेशद्वारावरील फलकाकडेही तिने दुर्लक्ष केलं. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ती थांबली नाही. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण आणि मुख्य नियंत्रण कक्षाला या घटनेबद्दल सतर्क केलं. तरुणीला बाहेर पडताना दिसलं की पोलीस तिची वाट पाहात आहेत.
advertisement
पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणीला तिचा लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे मागितली असता तिने सहकार्य करण्यास नकार दिला. पोलिसांनी तिला आपल्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं, तेव्हा तिने पिस्तुलाच्या आकाराची वस्तू काढून पोलिसांना म्हटलं, की ती गोळी घालू शकते. मात्र, ही वस्तू सिगारेट लायटर असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी लायटर आणि दुचाकी जप्त करून तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं, त्यानंतर तिच्या भावाला माहिती दिली.
advertisement
पोलिसांनी तरुणीविरुद्ध कलम 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळ), 186 (एखाद्या सार्वजनिक सेवकाला त्याच्या सार्वजनिक कार्यात हेतुपुरस्सर अडथळा आणणे), 279 (रॅश ड्रायव्हिंग), 336 (336) अंतर्गत एफआयआर दाखल केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: 26 वर्षीय तरुणीने वरळी सी लिंकवर पळवली बुलेट; पोलिसांनी आडवताच 'पिस्तूल' काढला अन्..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement