बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय होईल सर्वश्रुत आहे. दोघेही राजकारणामध्ये कुरखोडी करण्याची एकही संधी सोडत नसतात. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंजूर झाल्यापासून त्यांनी वाळूचे धोरण राबवले. त्यामध्ये राज्याचा महसूल बुडलाचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूचा महसूल कमी झालेला नाही. मात्र या धोरणामुळे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात वाळू तस्कर पोसले. ती आता होत नाही. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक महसूल बुडाला असा थेट आरोप विखेंनी केला.
advertisement
Pune : रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची घेतली भेट; चर्चेला उधाण
राधाकृष्ण विखे पाटलानंतर गप्प बसतील ते बाळासाहेब थोरात कसले. त्यांनीही लगेच पलटवार केला. महसूल खात्याचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. त्या खात्यामध्ये 22 ते 23 हजार कोटी रुपयांचं उत्पन्न हे गौण खनिज मधून येत असतं त्याबाबत मी बोललो होतो. त्यांना व्यक्तिगत माझ्यावर घसरण्याचं काही कारण नव्हतं मात्र मी काय भाषण केलेली आहेत ते त्यांच्या जिव्हारी लागलाच दिसतंय असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
