TRENDING:

Ahmednagar News : MIDC वरुन नगरचं राजकारण तापलं; सुजय विखे-रोहित पवार पुन्हा आमने-सामने

Last Updated:

Ahmednagar News : MIDC वरुन अहमदनगरमध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, 10 सप्टेंबर (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी आणि अहमदनगर मधील वडगाव गुप्ता येथील एमआयडीसीला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात चांगलेच राजकारण रणकंद सुरू झाले आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसी येण्यासाठी अनेक मार्गाने सरकारचे लक्ष वेधून पण यश आले नाही. मात्र, अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी केलेल्या एमआयडीसीच्या मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे. यावरून नगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झाले आहे.
सुजय विखे-रोहित पवार पुन्हा आमने-सामने
सुजय विखे-रोहित पवार पुन्हा आमने-सामने
advertisement

काय आहे प्रकरण?

आमदार रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसी येण्यासाठी अनेक मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्र सरकार यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मतदार संघापासून मंत्रालयापर्यन्त प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या एमआयडीसीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुसरीकडे मात्र खासदार सुजय विखे यांनी केलेल्या एमआयडीसीच्या मागणीला तत्वतः मंजुरी देण्यात आली. यावर रोहित पावर यांनी टीका केली आहे. कदाचित कर्जत जामखेड येथील मतदारांनी सुजय विखे यांना मतदान केले नसावे किंवा राम शिंदे यांचे आणि सुजय विखे यांचे जमत नाही. त्यामुळे कर्जत जामखेड मधील नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

advertisement

नगर शहरालगत असलेल्या एमआयडीसी जवळील वडगावगुप्ता येथे 600 एकरावर फेज 2 आणि शिर्डी येथे 500 एकरावर दुसरी एमआयडीसी अशा दोन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी महाराष्ट्र सारकरने दिली आहे. या एमआयडीसींमुळे जिल्ह्यातील 15 हजार तरुणांना रोजगार निर्माण होणार असल्याचेही सुजय विखेंनी सांगितले. मात्र, यावर राजकारण करू नये. 1986 साली जामखेडमध्ये एमआयडीसी मंजूर झाली आहे. त्यात आजपर्यंत नवीन उद्योग का नाही आणले? असा प्रश्न विखेंनी उपस्थित केला.

advertisement

वाचा - 'वेळप्रसंगी उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील'; जळगावच्या सभेत राऊतांचं मोठं वक्तव्य

खासदार सुजय विखे यांचा लोकसभेच्या मतदार संघात रोहित पवार यांचा विधनसभेचा मतदार संघ येतो. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जत, जामखेड मधील एमआयडीसी प्रश्न गाजणार हे मात्र नक्की. खासदार सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागणी केलेल्या अहमदनगर आणि शिर्डी येथील एमआयडीसीला तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे रोहित पवार यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकारने केल्याची चर्चा नगरमध्ये आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : MIDC वरुन नगरचं राजकारण तापलं; सुजय विखे-रोहित पवार पुन्हा आमने-सामने
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल