'वेळप्रसंगी उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील'; जळगावच्या सभेत राऊतांचं मोठं वक्तव्य
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावच्या सभेत बोलताना संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जळगाव, 10 सप्टेंबर, लक्ष्मण घाटोळ: जळगावच्या सभेमधून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वेळप्रसंगी उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील मुख्यमंत्री नसले तरी नेतृत्व करत आहेत, सत्ता येते जाते पण आमच्यात सत्ता आणण्याची धमक आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी?
संजय राऊत यांनी जळगावच्या सभेत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. वेळप्रसंगी उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील असं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा हा शुभसंकेत आहे. मुख्यमंत्री नसले तरी उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. सत्ता येते, जाते पण आमच्यात सत्ता आणण्याची धमक आहे. चार गेले तर दहा निवडून आणू, घराघरात आणि मनामनात शिवसेना आहे. शिवसेना सोडून जे गद्दार गेले ते अजूनही जनतेत जाऊ शकत नाही, कारण त्यांनी भीती आहे. जळगावची जनता आपल्या पाठिमागे उभी राहिल असं राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
मुंबई बसून देशाचं राजकारण करणारे दोनच नेते आहेत. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे उद्धव ठाकरे. आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही, आमचं राजकारण मुंबईत मातोश्रीवरूनच चालतं. उद्धव ठाकरे यांची सभा होऊ नये यासाठी बराच प्रयत्न करण्यात आला. मात्र उद्धवजी आले आणि त्यांनी जळगावला जिंकलं असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
September 10, 2023 2:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'वेळप्रसंगी उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील'; जळगावच्या सभेत राऊतांचं मोठं वक्तव्य