याबाबत मिळालेली माहिती अशी की, चार साधू त्र्यंबकेश्वरला निघालले होते. ते चहा घेण्यासाठी नवीन नगर परिसरात उतरले. चहा घेतल्यानंतर ते निघाले असताना काही जण आडवे आले. त्यांनी तुम्ही इकडे कसे काय आलात असं विचारत मारहाण करायला सुरुवात केली. साधूंना चार ते पाच जणांनी मारहाण केली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. मारहाण करणारे हे हिंदी भाषेत बोलत होते असंही मारहाण झालेल्या साधूंनी सांगितलंय.
advertisement
मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण सुरू असताना साधू जीव वाचवण्यासाठी पळत होते. तेव्हा त्यांचा पाठलाग करून मारहाण कऱण्यात आली. या प्रकारानंतर बजरंग दल, विहिंपसह हिंदुत्ववादी संघनांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणी लवकर कारवाई करावी अशी मागणी केलीय.
पोलिसांनी सांगितले की, साधूंना मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तणावाची स्थिती निर्माण करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
