सोमवारी सकाळी आठ वाजता...
नितीन शेटे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांनी राहत्या घरी छताला दोर टांगला आणि गळफास घेत आत्महत्या केली. नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह खाली उतरवून पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शनी शिंगणापूरमध्ये शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
टोकाचं पाऊल का उचललं?
आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक म्हणून नितीन शेटे यांची ओळख होती. शनि शिंगणापूरमध्ये त्यांचा मोठा वट होता. मात्र, त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं? यावर अद्याप माहिती समोर आली नाही. नितीश शेटे संस्थानमध्ये उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. परंतू अनियमितता समोर आल्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते. सध्या बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सायबर खात्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या देखरेखीखाली चौकशी आणि कारवाई करण्यात येत आहे. यावर एफआयआर दाखल करायचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले होते.
एफआयआर दाखल करायचे आदेश
दरम्यान, या प्रकरणानंतर शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनि शिंगणापूर देवस्थानात मंदिर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. आमदार विठ्ठल लंघे यांनी यावर आवाज उठवला होता. त्यानंतर आता भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असताना नितीश शेटे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सध्या मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.