आधी अर्ज वैध आता अवैध
बी फॉर्म अर्थात डमी उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या 5 नसल्यास अर्ज बाद करण्याचे आदेश आल्याने नेवासेत आधी छाननीमधील वैध झालेल्या उमेदवारांना परत बोलवून त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच या निर्णयाविरोधात नेवासेत न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. या निर्णयाचा फटका श्रीगोंदेतही बसला आहे.
advertisement
श्रीगोंद्यात चौरंगी लढत
श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक चौरंगी होत असून, भाजपकडून इंद्रायणी पाचपुते, सुनीता खेतमाळीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) ज्योती खेडकर, शिवसेना (शिंदे गट) कडून शुभांगी पोटे यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशातच इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज अपक्ष ठरल्याने मोठा गोंधळ उडाला.
मंगळवारी अचानक आदेश आला अन्...
माजी मंत्री बवानराव पाचपुते यांच्या सून आणि भाजपकडून बी फॉर्म सादर करणाऱ्या इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज अपक्ष ठरला आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी 'ए' 'बी' फॉर्म देण्यात येतो. निवडणूक आयोगाच्या आधीच्या नियमानुसार ए व बी फॉर्मसोबत एक सूचक असल्यास अर्ज वैध ठरत होता. पण मंगळवारी अचानक आदेश आला.
...म्हणून अर्ज अवैध ठरवला
दरम्यान, आदेशानंतर नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी (बी फॉर्म) उमेदवाराच्या अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा आणि त्या उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास व कागदपत्रांची तसेच अटी शर्तीची पूर्तता केली असल्यास त्याचा अर्ज अपक्ष म्हणून पात्र ठरवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे बबन पाचपुते यांच्या सुनेचा अर्ज अपक्ष ठरवण्यात आलाय.
