शेवगाव : रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या बहिणीला सासरी सोडायला जाताना झालेल्या अपघातात भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अक्षय मरकड असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. तेव्हा दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं शेवगाव तालुक्यातील घोटन इथं अपघात झाला. अपघातामुळे मरकड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर मिरी गावात शोककळा पसरली आहे.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रक्षाबंधन निमित्त आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीला परत सासरी सोडायला जात असतानाच झालेल्या अपघातात भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अक्षय विजय मरकड असे अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.
मुंबईहून गणेशोत्सवासाठी सकाळी गावी आले, दुपारी घराला लागली आग; वृद्धाचा मृत्यू, पत्नी जखमी
पैठण तालुक्यातील सोलनापूर येथे सासरी राहत असलेली बहिण अश्विनी महेश खराद ही रक्षाबंधन निमित्त आपल्या दोन भावांना राखी बांधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिरी आपल्या माहेरी आलेली होती. आपल्या बहिणीला पुन्हा सासरी सोडण्यासाठी तिचा लहान भाऊ अक्षय विजय मरकड हा हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या मोटरसायकल वरून निघाला होता. शेवगाव तालुक्यातील घोटन येथे समोरून मोटारसायकल वरून आलेल्या मद्यपीने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. सदर अपघातात अक्षय याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यास स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
मुंबईहून गणेशोत्सवासाठी सकाळी गावी आले, दुपारी घराला लागली आग; वृद्धाचा मृत्यू, पत्नी जखमी
मालवण तालुक्यातील मसुरे मेढावाडी येथील आग लागून घर भस्मसात झालं. या आगीत प्रभाकर माने यांचा मृत्यू झाला तर पत्नी शुभदा माने गंभीर जखमी झाल्या आहेत. शुभदा यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रभाकर माने आपल्या पत्नीसह मुंबई येथून गणेशोत्सव निमित्त मसुरे येथे आले होते आणि ही दुर्दैवी घटना घडली.