मत देणे हा तुमचा अधिकार आहे. मत दिले तर ठीक, नाहीतर मी अर्थ मंत्री आहेत. कुणाला कुठे किती निधी द्यायचा हा माझा अधिकार आहे, तुम्ही काट मारली तर मी ही काट मारेन, असे असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
advertisement
मतदारांना धमकी दिल्याच्या आरोपावर अजित पवार यांचे उत्तर
औसा येथील भुईकोट किल्ल्याच्या परिसरात झालेल्या जाहीर सभेत अजित पवार म्हणाले की, मी माझी भूमिका मांडतो. विरोधकांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपाला मी प्रत्युत्तर उत्तर देत नाही. मी विकास कामाला महत्त्व देतो.
...आम्ही काय दमदाटी केली काय?
राज्यात ज्या ठिकाणी बिनविरोध जागा निवडून आल्या त्या दमदाटी किंवा पैशाच्या जोरावर निवडून आल्या हे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे. बारामतीत माझ्या राष्ट्रवादीच्या ८ जागा बिनविरोध आल्या. मग आम्ही काय दमदाटी केली म्हणायचे का? असा सवाल त्यांनी विचारला.
सगळीकडे युती का झाली नाही? अजित पवार म्हणाले...
युतीच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, जिथे शक्य असेल तिथे आम्ही महायुती केलेली आहे. 9-10 वर्षांनी निवडणुका होत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना वाटते आपल्याला शेवटची संधी मिळावी. नव्यांना वाटतं आम्ही किती दिवस थांबायचं? त्यामुळे सगळीकडेच उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जेवढी समंजसपणाची भूमिका घेता येईल तेवढी आम्ही तीनही पक्षांनी घेतली आहे. काही ठिकाणी एकोपा झाला नाही, तिथे आम्ही स्वबळावर लढतोय, असे अजित पवार यांनी सांगितले.
संयमी नेतृत्वाला विजयी करा
औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती परवीन नवाबोद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना अजित पवार यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती परवीन नवाबोद्दीन शेख या अनुभवी आहेत, संयमी आहेत आणि औसाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व देऊ शकतात. त्या सर्व समाजांना सोबत घेऊन चालतील, असा विश्वास या सभेत व्यक्त केला. औसाकरांनी येत्या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हावर विश्वास ठेवा, बटण दाबा आणि औसा शहराच्या विकासाला गती द्या, असे आवाहन त्यांनी केले.
