TRENDING:

Ajit Pawar Waqf Law: आधी पाठिंबा, आता राष्ट्रवादीत नाराजी? 'वक्फ'वरून अजितदादा घेणार अमित शाहांची भेट

Last Updated:

Ajit Pawar meet Amit Shah : वक्फ सुधारणा विधेयकाला अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता, अजितदादांच्या पक्षात नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई : केंद्र सरकारने नुकतचं संसदेत वक्फ बोर्ड कायदा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्याने हा वक्फ बोर्ड सुधारीत कायदा लागू झाला आहे. या वक्फ सुधारणा विधेयकाला अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता, अजितदादांच्या पक्षात नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे. पक्षातील नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्यांबाबत ही भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ अमित शाह यांनी सभागृहात जे आश्वासन दिलं ते कागदावर असाव अशी मागणी करणार आहे.

कोणत्या मुद्यावर आक्षेप?

सूत्रांच्या माहितीनुसार, वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम सदस्य नको, अशी आग्रही भूमिका घेण्यात येणार आहे. अनेक वर्षापासून वक्फ बोर्डकडे जी जमीन आहे, त्याचे मूळ मालक कोण याचा शोध घेण्याबाबत जो मुद्दा मांडला आहे त्याचा विचार करावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

संसदेत सादर केलेल्या विधेयकामधे 40 पैकी 14 विषय बाजूला करण्यात आले आहेत, अशी सभागृहात माहिती देण्यात आली त्याबाबत देखील कागदोपत्री स्पष्टता आणावी याबाबत देखील विनंती अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवदेनाची जबाबदारी मलिकांवर ...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

पक्षाकडून माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सदर भेटीसाठीचे निवेदन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळची भेट होणार आहे. शिष्टमंडळात अल्पसंख्याक विभागाचे मोजके पदाधिकारी आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश असणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Waqf Law: आधी पाठिंबा, आता राष्ट्रवादीत नाराजी? 'वक्फ'वरून अजितदादा घेणार अमित शाहांची भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल