TRENDING:

नियतीचा क्रूर खेळ! ज्या घडाळ्यासाठी जीवाचं रान केलं, त्याच घडाळ्याने मृतदेहाची ओळख पटवली; दादांच्या एक्झिटची चटका लावणारी कहाणी

Last Updated:

विमान अपघात एवढा भीषण होता की, विमानातील सर्व जळून खाक झाले . या विमानाचा जळून कोळसा झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बारामतीत अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. आज अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आली होती.
News18
News18
advertisement

आजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले.

advertisement

घड्याळावरून कशी ओळख पटली? 

विमान अपघात एवढा भीषण होता की, विमानातील सर्व जळून खाक झाले . या विमानाचा जळून कोळसा झाला. अपघाताच्या ती अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या मनगटावरच्या घड्याळावरून पटल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातात असलेला घड्याळ, त्यांनी घातलेला गॅगल आणि जॅकेटमुळे ओळखण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर सर्व मृतदेह झाकण्यासाठी स्थानिकांनी ब्लँकेट पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले.

advertisement

हेही वाचा: अजित पवार योजना क्रॅश लाईव्ह अपडेट

नियतीचा क्रूर खेळ

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे राहिलं आणि आज मनगटावरच्या घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची शेवटची ओळख पटणं, हा नियतीचा क्रूर खेळ म्हणावा की आणखी काही, अश चर्चा सुरू आहे.

हा अपघात कसा घडला?

  • पुणे बारामती परिसरात दाट धुकं
  • advertisement

  • धावपट्टी परिसरात दृश्यमानता खूपच कमी
  • बारामतीच्या धावपट्टीवर आयएलएस सिस्टिम नव्हती
  • अनेकदा पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागते
  • थेट धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमानानं हवेत फेरी मारली
  • पहिला लँडिंगचा प्रयत्न अपयशी ठरल्याची शक्यता
  • दुसऱ्यांदा पुन्हा वैमानिकाकडून लँडिंगचा प्रयत्न
  • धुक्यामुळं पायलटला रनवेचा अंदाज आला नाही
  • पायलटनं MAY DAY... MAY DAYचा संदेश दिला
  • अपघातावेळी विमान शंभर फूट उंचीवर होतं
  • advertisement

कोणत्या कंपनीचं होतं विमान? 

  • एयरक्राफ्ट टाईप - Learjet 45XR
  • एयरलाईन - व्हीएसआर अविएशन
  • एयरक्राफ्ट रजिस्ट्रेशन - VT-SSK
  • टाईप कोड - LJ45
  • टेक ऑफची वेळ - 8 वाजून 10 मि.
  • लँडिंगची वेळ - 8 वाजून 50 मि.
  • ठिकाण- बारामती

महाराष्ट्राने लाडका नेता गमावला 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अजितदादांची चटका लावणारी एक्झिट, पुण्यातील जिजाई बंगल्यावर भावुक वातावरण Video
सर्व पहा

अजित पवारांच्या अपघाती निधनाची बातमी समजल्यानंतर कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. आपला लाडका नेता गेल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नियतीचा क्रूर खेळ! ज्या घडाळ्यासाठी जीवाचं रान केलं, त्याच घडाळ्याने मृतदेहाची ओळख पटवली; दादांच्या एक्झिटची चटका लावणारी कहाणी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल