TRENDING:

अजितदादांच्या विमान अपघाताचा होणार 'थ्री लेअर' तपास, सगळा कांड समोर येणार, AAIB ॲक्शन मोडमध्ये

Last Updated:

अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या तपासाला वेग आला असून, एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने या प्रकरणाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता या भीषण अपघाताच्या तपासाला वेग आला असून, एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने या प्रकरणाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. तपासाच्या पहिल्या टप्प्यातील 'साईट इन्व्हेस्टिगेशन' पूर्ण झाले असून, आता विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडून त्यातील डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरी विमान महासंचनालयाच्या (DGCA) मार्गदर्शनाखाली हा तपास तीन महत्त्वाच्या स्तरांवर केला जाणार आहे.
News18
News18
advertisement

तपासाचे 'थ्री लेअर' नेमके काय आहेत?

थ्री लेअर तपासात सगळ्यात आधी तांत्रिक माहितीचे संकलन केलं जाईल. ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण केलं जाईल. यामध्ये विमानाचा वेग आणि उंची, इंजिनचे तापमान आणि हवेचा दाब, विमानाच्या पंखांची हालचाल, पायलट्समधील अखेरच्या क्षणांचं संभाषण अशा महत्त्वाच्या बाबी तपासल्या जातील.

दुसऱ्या लेअरमध्ये केवळ तांत्रिक डेटावर अवलंबून न राहता, अवशेषांचे प्रयोगशाळेत विश्लेषण केलं जाईल. विमानाचे सुटे भाग, इंजिनचे तुकडे आणि धातूंचे विश्लेषण करून तांत्रिक बिघाड नेमका कधी आणि कसा झाला? याची शहानिशा केली जाईल.

advertisement

तिसऱ्या लेअरमध्ये अंतिम अहवाल आणि निष्कर्ष काढून सर्व माहिती एकत्रित करून अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाईल. मात्र, हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.

तपासाअंती स्पष्ट होणार सत्य

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

विमान कोसळण्यामागे मानवी चूक होती, तांत्रिक बिघाड होता की हवामानाचा परिणाम, हे या 'थ्री लेअर' तपासाअंती स्पष्ट होईल. AAIB या सर्व प्रकरणाचा अहवाल नागरी विमान महासंचनालयाकडे सोपवणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या विमान अपघाताचा होणार 'थ्री लेअर' तपास, सगळा कांड समोर येणार, AAIB ॲक्शन मोडमध्ये
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल