दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये कमी दृश्यमानता (Visibility), VFR नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील सुरक्षा त्रुटी याकडे गंभीर बोट ठेवण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला, मात्र रॉ डेटा रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विमान अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकांचे संभाषण देखील समोर आहे. पायलटने शेवटी ओह शिट असं म्हटल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
advertisement
DGCA च्या प्राथमिक अहवालात काय समोर आले?
म्हटले आहे की, आदल्या रात्री विमान सुरतहून आल्यानंतरच्या चाचणीत कुठलीच अडचण नसल्याच तपासणी तंत्रज्ञाच मत आहे. अहवालात कुठलीही जबाबदारी निश्चित करणार स्पष्ट मत नाही . प्राथमिक अहवालात अपघाताच्या तांत्रिक नोंदींमध्ये विमानात कुठलाही बिघाड नसल्याची नोंद आहे. पुणे एटीसीच्या हवाई हद्दीनंतर बारामती एटीसी सोबत संपर्क होऊन विमान उतरण्यासंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. अपघात मानवी चूकांमुळे झाल्याच सुतोवाच अहवालात करण्यात आले आहे.
रोहित पवार काय म्हणाले होते?
विमानाचा एकच नाही तर विमानाचे बरेच स्फोट झाले होते., दादांचं विमान रनवेवर पडलं नाही, त्यामुळे त्याची वेलोसिटी कमी होती. मग स्फोट का झाला? त्यामुळे त्यात अधिकचे फ्युएल टँक होते, म्हणून स्फोट झाला ही आमची शंका खरी होत आहे. हे फ्युएल टँक टॉयलेटच्या बाजूला असतात. त्याच्याच मागच्या बाजूला (पंखांच्या इथे) ब्लॅक बॉक्स असतो, असं रोहित पवार म्हणाले. या पंखांत टँक फुल भरला होता. हे विमान सुरतहून मुंबईमार्गे बारामतीला आलं होतं. बारामतीहून पुन्हा हैदराबादला जाणार होतं. त्यामुळे हैदराबादला जाऊनही इंधन भरता आलं असतं. पण टँक पूर्णपणे भरून म्हणजेच तीन हजार लीटर इंधन भरून विमान बारामतील नेण्यात आलं.
