TRENDING:

NCP Ajit Pawar: निवडणुकीआधी राष्ट्रवादीने भाकरी फिरवली, राडा घालणार्‍या सूरज चव्हाणचे कमबॅक, रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी

Last Updated:

NCP Ajit Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीने आज आपल्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मोठे बदल करण्यात आले आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड झाली आहे. राडा घातल्याप्रकरणी पक्षातून जबाबदारी कमी केलेल्या सूरज चव्हाण यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. तर, दुसरीकडे पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात रान उठवणाऱ्या रुपाली ठोंबरे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर, अमोल मिटकरी यांना देखील धक्का देण्यात आला आहे.
निवडणुकीआधी राष्ट्रवादीत भाकरी फिरवली, राडा घालणार्‍या सूरज चव्हाणचे कमबॅक, रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी
निवडणुकीआधी राष्ट्रवादीत भाकरी फिरवली, राडा घालणार्‍या सूरज चव्हाणचे कमबॅक, रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी
advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीने आज आपल्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

रुपाली चाकणकरांवर विश्वास, ठोंबरेंना धक्का...

फलटण प्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पक्षातील रुपाली ठोंबरे यांनी आंदोलन करत कोंडी करण्याचे प्रयत्न केले होते. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या नव्या यादीत रुपाली ठोंबरे यांना नारळ देण्यात आला आहे. चाकणकरांसोबत वाद त्यांना भोवला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, रुपाली चाकणकर यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

advertisement

आक्रमक आणि उपरोधिक टीका करणारे आमदार अमोल मिटकरी यांनादेखील प्रवक्ते पदावरून कमी करण्यात आले आहे. मिटकरी यांनी याआधी केलेल्या काही वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता त्यांच्याकडून ही जबाबदारी काढण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून प्रवक्तेपदासाठी कोणाला संधी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्यानंच नाव काढलं, केलं मालामाल,खुराक माहित आहे का?
सर्व पहा

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत अनिल पाटील, रुपाली चाकणकर, चेतन तुपे, आनंद परांजपे, अविनाश आदिक, सना मलिक, सूरज चव्हाण, प्रतिभा शिंदे, हेमलता पाटील, श्याम सनेर, सायली दळवी, राजीव साबळे, आदींची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Ajit Pawar: निवडणुकीआधी राष्ट्रवादीने भाकरी फिरवली, राडा घालणार्‍या सूरज चव्हाणचे कमबॅक, रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल