सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काही महिने शिल्लक आहेत. लवकरच या निवडणुका पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यातील काही भागांमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. दरम्यान माढा तालुक्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. माढा तालुक्यातील अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत सिंह शिंदे हे येत्या 29 तारखेला मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ऑपरेशन लोटसमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार मोहोळचे यशवंत माने, सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे, सोलापूरचे दिलीप माने, मोहोळचे राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता अजित पवार गटाचे माढ्यातून विधानसभेला उभारलेले रणजीत सिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
रणजीत सिंह शिंदे हे माजी आमदार बबन दादा शिंदे यांचे सुपुत्र आहेत बबन दादा शिंदे हे मागील तीस वर्ष माढा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर मागील विधानसभेला त्यांनी त्यांचा मुलगा रणजीतसिंह शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती परंतु आता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
सोलापूरमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस
सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने ऑपरेशन लोटस सुरू करून आजी माझी आमदारांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या भाजपकडे राहाव्यात यासाठी या सर्व पक्षप्रवेशाची सुरुवात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती. मागील काही थोडे दिवस माध्यमांमध्ये याची मोठी चर्चा असल्यामुळे या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील पक्षप्रवेश सुरू करण्यात आले आहेत. माढा तालुक्याचे रणजीतसिंह शिंदे हे आता येत्या 29 तारखेला मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शत प्रतिशत यश मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून विरोधी पक्षांसह मित्रपक्षातीलही माजी लोकप्रतिनिधी, नेते, स्थानिक नेत्यांना पक्षाचे दरवाजे उघडले आहेत.
हे ही वाचा:
