TRENDING:

Ajt Pawar DYSP Anjana Krishna : अजितदादांसोबत फोनवरून खडाजंगी, आता UPSC नेमणुकीवर प्रश्नचिन्ह! राष्ट्रवादीच्या नेत्याची चौकशीची मागणी

Last Updated:

Ajt Pawar DYSP Anjana Krishna : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या महिला DYSP अंजना कृष्णा यांच्याशी केलेल्या व्हिडीओ कॉलचा एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजितदादांसोबत फोनवरून खडाजंगी, आता UPSC नेमणुकीवर प्रश्नचिन्ह! राष्ट्रवादीच्या नेत्याची चौकशीची मागणी
अजितदादांसोबत फोनवरून खडाजंगी, आता UPSC नेमणुकीवर प्रश्नचिन्ह! राष्ट्रवादीच्या नेत्याची चौकशीची मागणी
advertisement

कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या महिला DYSP अंजना कृष्णा यांच्याशी केलेल्या व्हिडीओ कॉलचा एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या व्हिडिओमध्ये पवार यांनी फोनवरून अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचे दिसून आले. त्यानंतर हा मुद्दा माध्यमांत झळकला आणि संबंधित गावातील काही शेतकरी तसेच फोन लावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. DYSP अंजना कृष्णा यांच्या आयपीएसबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने थेट दिल्लीत पत्रव्यवहार केला आहे.

advertisement

सोलापूरमधील करमाळ्यातील या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी नवा वाद पेटवला आहे. त्यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील (UPSC) नेमणुकीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात तक्रार पत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

advertisement

अमोल मिटकरी यांनी सांगितले की, “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही, असे सांगणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. शेतकऱ्यांना गुंड ठरविण्यापर्यंत मजल जाणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या कागदपत्रात काही घोळ असावा, अशी शंका येते. पूजा खेडकर प्रकरणासारखा हा प्रकार नाही ना, याची चौकशी व्हावी.” त्यांनी अंजना कृष्णा या ‘मग्रूर अधिकारी’ असल्याची टीकाही केली. अजित पवारांविरोधात विनाकारण आकांडतांडव सुरू आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्र्यांचे काहीही चुकलेले नाही,” असेही मिटकरी म्हटले. अजित पवार-IPS अंजना कृष्णा वाद आता राजकीय रंग घेत आहे. आगामी काळात या चौकशीच्या मागणीमुळे राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या. मात्र स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. आत्ताच्या आत्ता कारवाई थांबवा, असा आदेश अजित पवार यांनी दिला. त्यावेळी मी आपल्याला ओळखले नाही. तुम्ही माझ्या नंबरवर व्हिडीओ कॉल करा, असे अंजना कृष्णा अजित पवार यांना म्हणाल्या. त्यावर तुमच्यात एवढी हिम्मत आली... तुमच्याविरोधात मी कारवाई करेन, असा दम अजित पवार यांनी दिला. दोघांमधल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajt Pawar DYSP Anjana Krishna : अजितदादांसोबत फोनवरून खडाजंगी, आता UPSC नेमणुकीवर प्रश्नचिन्ह! राष्ट्रवादीच्या नेत्याची चौकशीची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल