पावसाळ्यात वॉटर पार्कला आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्यात पावसाला सुरुवात होताच भिगवणपासून जवळ असणाऱ्या अकलूजच्या वॉटर पार्कला उद्योजक धुमाळ आणि त्यांच्या तीन मित्रांनी जाण्याचे नियोजन केले. वॉटर पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तुषार धुमाळ हे त्यांच्या दोन मित्रांसह सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये फिरायला आले होते. तिघे मित्र राईडमध्ये बसले, पण राईडचा वेग वाढल्यानंतर अचानक पाळणा खाली कोसळला. राईडचा वेग जास्त असल्यामुळे पाळणाही त्याच वेगामध्ये खाली पडला आणि तुषार धुमाळ यांना गंभीर दुखापत झाली. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातल्या एकाची मान फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. फिरता पाळणा खूप उंचावरून पडल्यामुळे धुमाळ गतप्राण होऊन पडले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.
advertisement
कोण आहेत तुषार धुमाळ?
तुषार धुमाळ हे भिगवण येथील युवा उद्योजक आहेत
एलआयसी वर्तुळात त्यांचा गवगवा होता
अल्पावधीतच त्यांनी उद्योग वर्तुळात मोठे नाव कमावले होते
युवा उद्योजक म्हणून त्यांची भिगवण आणि परिसरात ओळख होती
उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची उंच भरारी घेणे सुरू होते
परंतु अकलूजच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने भिगवण आणि पंचक्रोशीवर दु:खाचे सावट आहे