पैशांचे आमिष दाखवत धर्मांतराचा आरोप
वडवणी शहरातील कानपूर रस्त्यालगत असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या सभागृहात हा प्रकार सुरू असल्याची तक्रार आहे. वडार, कैकाडी, भोई यांसारख्या विविध समाजातील तसेच शिख धर्मातील शिकलकरी बांधवांसह इतर महिला-पुरुषांना ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले जात असल्याची तक्रार शेनोरे यांनी केली आहे. रविवारीही अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सुमारे १०० नागरिक उपस्थित होते. हा प्रकार गेल्या ९ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.
advertisement
हिंदू जागरण मंच आणि ठाकरे गट आक्रमक
धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळताच हिंदू जागरण मंच आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मसनजोगी, शिकलकरी, भोई, वडार अशा विविध जाती-धर्मातील लोकांचे समुपदेशन (कौन्सेलिंग) केले जात होते. याची माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. पोलिसांनी पास्टर दिनेश लोंढे यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
'मी केवळ प्रवचन देतो'- पास्टर लोंढे यांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर पास्टर दिनेश लोंढे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मी इथे केवळ बायबलवर प्रवचन देतो. लोकांच्या मनःशांतीसाठी मी प्रबोधनाचे काम करत आहे आणि बायबलमधील चांगले विचार मी लोकांना सांगतो."