खरं तर विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदेंना चेक दिला होता. आता शिंदेंकडून अर्थ खात्याची मागणी करण्यात आल्याने अजित पवारच चेकमेट मिळाला होता.त्यामुळे पराभव टाळण्यासाठी अजित पवारांनी सोमवारी रात्री 8 वाजता दिल्लीत पोहोचले होते. मात्र दोन दिवस दिल्लीत थांबून देखील अजित पवारांची अमित शांहांशी भेटच झाली नाही आहे. त्यामुळे आता अमित शाहांनी आता अजित पवारांना भेट टाळल्याची चर्चा सूरू झाली आहे.
advertisement
अजित पवार सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते. त्याचवेळी अमित शाहा चंदीगडला निघून गेले होते. त्यानंतर मंगळवारी अमित शाहा आणि अजित पवारांची भेट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी दिवसभर अमित शहा यांनी अजित पवार यांना भेट दिली नाही आहे. विशेष म्हणजे अजित पवार या भेटीत राष्ट्रवादीला ज्यादा मंत्रिपद मिळावीत असा दावा करणार होते. त्याचसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीला समान मंत्रीपदे देण्याची मागणी करणार होते. तसेच अजित पवारांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद हवे असल्याची माहिती होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अवाजवी मागण्यांना टाळण्याकरता अमित शहा भेट नाकारत असल्याची चर्चा सूरू झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीतून अजित पवारांना खाली हात परतावे लागणार आहे.
दरम्यान अजित पवार दुपारी 2 वाजता मुंबईत दाखल होऊन थेट राजभवनला जाणार आहेत. तसेच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी 3.30 ची वेळ दिली आहे. आणि शपथवीधी सोहळ्याची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात थोड्यावेळात बैठक सुरू होणार असल्याची माहिती आहे.
