सूजल राम समुद्रे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं मंगळवारी रात्री बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये लग्न सुरू होतं. शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह समारंभ पार पडत होता. लग्न सुरू असताना अचानक विवाहस्थळी गोंधळ उडाला. दोन तरुणांनी स्टेजवर येऊन सूजलवर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी धारदार चाकुने सूजलला भोसकले.
जितेंद्र राघो बक्षी आणि त्याच्या त्याच्या एका साथीदाराने हा हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ न्यूज 18 लोकमत च्या हाती आले असून दोन्ही आरोपी हल्ला करून पळून जाताना दिसत आहेत. या दोन्ही आरोपींचा ड्रोनने बरंच अंतर पाठलाग करण्यात आला. यावेळी नवरदेव सुजल याचे वडील आरोपींना पकडायला गेले. आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले. हा सगळा प्रकार ड्रोन कॅमेरात कैद झाला आहे.
advertisement
याचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लग्नसमारंभात अशाप्रकारे हल्ला झाल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
