आता गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अनंत गर्जे याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात तपासासाठी राज्य सरकारने बनवलेल्या विशेष तपास पथकाने ही अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
अनंत गर्जेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, एसआयटीने गर्जेला अटक केली आहे. डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून सुरू पुढील तपास सुरू आहे.
खरं तर, ज्यावेळी गौरी गर्जे मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा काही तासांतच वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. तेव्हापासून गर्जे आधी पोलीस कोठडीत आणि त्यानंतर न्यायालयीन कोठीडीत आहे. वरळी पोलिसांनी अटक केलेल्या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. अशातच त्याला दुसऱ्यांदा अटक केली आहे. ही अटक मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या एसआयटीकडून झाली आहे. त्यामुळे आता एसआयटीच्या तपासात अजून काय माहिती समोर येणार? हे पाहावं लागणार आहे.
