TRENDING:

अजित पवारांनी आंदेकर कुटुंबाला उतरवलं मैदानात, कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह तिघांना तिकीट

Last Updated:

पुण्यातील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बंडू आंदेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अटकेत असलेल्या आंदेकरला न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.
News18
News18
advertisement

न्यायालयाने काय म्हटले?

बंडू आंदेकर याने काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडे अर्ज केला होता. अजित पवार गटाकडून निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी अर्ज भरण्याची मुभा मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. "निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यापासून कोणालाही रोखता येणार नाही," असे स्पष्ट करत न्यायालयाने आंदेकरला निवडणूक लढण्यास परवानगी दिली होती.

advertisement

अटी आणि शर्ती काय आहेत?

न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार, बंडू आंदेकरला कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन करता येणार नाही. अर्ज भरताना घोषणाबाजी करता येणार नाही. शिवाय गर्दी गोळा करण्यास मनाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकरला कडक पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं जाईल. इथं अर्ज भरल्यानंतर पुन्हा कोठडीत नेलं जाईल.

आंदेकर कुटुंबातील तिघांचे अर्ज

advertisement

आज केवळ बंडू आंदेकरच नाही, तर आंदेकर कुटुंबातील इतर दोन सदस्यही अर्ज भरणार आहेत. यामध्ये बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर तिघांचा समावेश आहे. आज साडेअकरा वाजता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हे अर्ज दाखल केले जातील.

अजित पवार गटाची 'गुपित' रणनीती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाने या तिन्ही उमेदवारांना हिरवा कंदील दिला आहे. मात्र, आंदेकर टोळीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पक्षाकडून या उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. कुठेही याची वाच्यता न करता थेट अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला सत्तेतील पक्षाने उमेदवारी दिल्याने आता पुण्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांनी आंदेकर कुटुंबाला उतरवलं मैदानात, कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह तिघांना तिकीट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल