मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चडचण परिसरातील भीमातीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली.कर्मचारी गेटला कुलूप न लावता काम करत असताना, तीन मुखवटा घातलेले लोक शाखेत घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि चाकूने धमकावले.त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांकडून स्ट्राँग रूममधून माहिती काढत त्यांना नंतर बांधून ठेवले होते.
advertisement
या घटनेनंतर चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटांत बँक लुटली आणि ते पसार झाले होते. या दरम्यान एका ग्राहकाने बँकेत जाऊन पाहिले असता काही कर्मचाऱ्यांचे हात बांधलेले होते आणि तोंड देखील बांधलेले होते.त्यानंतर बॅक कर्मचाऱ्यांची सुटका झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सूरूवात केली होती.
या प्रकरणात महाराष्ट्रातील मंगळवेढा गावात चोरट्यांनी वापरलेली गाडी आढळून आली आहे. पण अद्याप पोलिसांची हाती आरोपी आणि मुद्देमालही सापडला नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करते आहे.
दिवसा ढवळ्या दीड कोटीची चोरी
वसईतील दरोड्याचा थरार समोर आलाय. शास्त्रीनगरमधील एका ज्येष्ठ व्यक्तीला शौचालयात कोंडून दरोडा टाकला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांनी घरातील रोकड रकमेसह लाखोंचा किमती ऐवज लंपास केला आहे .
वसई पश्चिमेच्या शास्त्रीनगर येथील किशोर कुंज इमारतीत एका चोरट्याने आत प्रवेश करून घरी एकटेच असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शौचालयाचा पाईप लिकेज झाल्याचे सांगून शौचालय ढकलून कोंडून ठेवले. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात चोरट्याचा तपास सुरू आहे.
वसईत शास्त्री नगरच्या किशोर कुंज इमारतीत भानुशाली यांच्या घरी भरदिवसा ढवळ्या दीड कोटीची चोरी करण्यात आली आहे. घरातील महिला रक्षाबंधनसाठी भावाकडे गेल्या होत्या त्यावेळी ज्येष्ठ नागरिक भानुशाली एकटेच घरात होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने नकली दाढी लावून संवाद साधत घरात प्रवेश मिळवला.
घरात गेल्यानंतर गप्पा मारल्यानंतर वॉशरूम ला जायचे आहे असे सांगून वॉशरूममध्ये गेला. वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर वॉशरूमचा पाईप लिकेज झाला आहे, असे सांगितले. भानुशाली हे कुठे लिकेज झाले हे पाहण्यासाठी शौचालयात गेले. त्याचवेळी चोरट्याने बाहेरून दरवाजा लावला, घरमालकाला शौचालयात कोंडले. घरमालकाचे आणि त्यांच्य मुलीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला आहे.