TRENDING:

Medical Officer Bharti 2025: सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Last Updated:

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी बंपर भरती सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारखेला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाराष्ट्रामध्ये पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वत्र मेगाभरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी बंपर भरती सुरू आहे. 1440 रिक्त पदांसाठी ही भरती पार पडणार आहे. कोणकोणत्या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे? शैक्षणिक पात्रता काय? सह भरतीसंबंधित सविस्तर माहिती या बातमीमध्ये इच्छुकांना मिळणार आहे.
News18
News18
advertisement

भरतीच्या जाहिरातीची ऑनलाईन PDF

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या भरती प्रक्रियेचा शेवटचा दिवस 31 मार्च 2026 आहे. 31 मार्च 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची आणि ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अर्ज भरण्याच्या तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी गट- अ (मेडिकल ऑफिसर)- MBBS आणि वैद्यकीय अधिकारी गट-अ (मेडिकल ऑफिसर)- विशेषज्ञ अशा दोन रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

advertisement

वैद्यकीय अधिकारी गट- अ (मेडिकल ऑफिसर)- MBBS या पदांसाठी 766 रिक्त जागा आहेत. तर, वैद्यकीय अधिकारी गट-अ (मेडिकल ऑफिसर)- विशेषज्ञ पदासाठी 774 रिक्त जागा असणार आहेत. अशा एकूण 1440 रिक्त जागांवर नोकरभरती केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी गट- अ (मेडिकल ऑफिसर)- MBBS पदासाठी MBBS ची पदवी असणे अनिवार्य असणार आहे. तर, वैद्यकीय अधिकारी गट-अ (मेडिकल ऑफिसर)- विशेषज्ञ पदासाठी वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/ पदविका किंवा समतुल्य असणे अनिवार्य असेल.

advertisement

ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर इंजिनिअरची कमाल, कचऱ्यातून बंपर कमाई, ‘त्या’ वस्तूंना अमेरिका ते दुबई जगभरात डिमांड! Video
सर्व पहा

दोन्हीही पदांसाठी 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. 20 मार्च 2026 रोजी उमेदवाराचं नमूद केलेलं वय पूर्ण केलेलं असावं. दरम्यान, मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना 5 वर्षे सूट मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये परिक्षा शुल्क आहे. तर, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, महिला आणि खेळाडू असलेल्या उमेदवारांना 700 रूपये परिक्षा शुल्क आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोकरभरती पार पडणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Medical Officer Bharti 2025: सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल