महाराष्ट्राचं एफस्टिन फाईल्स म्हणून कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणावर विरोधक टीका करत आहे. मागील अनेक वर्षांपासून खरातने भोंदुगिरीचं दुकान मांडलं होतं. नाशिकमधील सिन्नरमध्ये त्याने आपल्या फॉर्म हाऊस, ऑफिसमध्ये अनेक महिला भाविकांचा छळ केल्याचा आरोप आहे. खरात यांचं नाशिकमधली शरणापूर रोडवर ओकस प्रॉपर्टी नावाचं ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये नीरज जाधव हा ऑफिस बॉय म्हणून कामाला लागला होता. नीरज हा नाशिक इथला रहिवासी आहे. कोरोनाच्या काळापासून तो अशोक खरात याच्याकडे काम करत होता.
advertisement
हाती लागले व्हिडीओ अन् नीरजची नियत फिरली
नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. ऑफिसमध्ये आपला बॉस खरात हा महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं त्याच्या नजरेस पडलं. त्यानंतर नीरजने एखाद्या सिनेमाला लाजवेल असा प्लॅन केला. नीरजने खरातच्या नकळत ऑफिसमधील 58 सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले. ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे हे काम त्याला सहज करता आलं.
खरातकडे मागितले ५ कोटी
आता व्हिडीओ हातात लागल्यानंतर नीरज जाधवने आपल्याचं बॉस खरातला ब्लॅकमेल करण्याचा चंग बांधला. खरातकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे, हे नीरजलाा माहित होतं. त्यामुळे नीरजने खरातकडे 5 कोटींची मागणी केली होती. आपल्याकडे काही व्हिडीओ आहे, असं नीरजने खरातला बजावलं. पण, अशोक खरात हा इतक्या सहज ऐकणारा नव्हता. अशोक खरातने नीरजला पैसे देण्यास नकार दिला होता.
खरातने नकार दिल्यामुळे नीरजचा 'प्लॅन बी'
बॉस अशोक खरातने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे नीरजला वाटलं आपला प्लॅन फसला. त्यामुळे त्याने आपला मोर्चा पीडित महिलांकडे वळवला. पुढे जाऊन पीडितांच्या मदतीनं पुन्हा ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करण्यात आला होता. शिर्डीतील महिलेला मॉर्फ फोटो, व्हिडिओ खरातला पाठवले होते. एवढंच नाहीतर, नीरजने काही पीडित महिलांना फोटो, व्हिडीओ मार्फ करून ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला. नीरज हा आपल्याला धमकावत असल्याची तक्रारच काही महिलांनी खरातकडे केली होती, अशीही माहिती समोर आली.
पीडित महिलांची पोलिसांकडे तक्रार
त्यानंतर खरात याने पीडित महिलांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. नीरजकडून आणखी एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. 'त्या' महिलेचा व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवला असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर नाशिकमधील पीडितेनं पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात खरातचे व्हिडीओ समोर आले आणि त्याला अटक झाली.
नीरज जाधव पोलिसांसमोर शरण
भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली . पण, त्यांचं हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या तरुणाने खरात याचे व्हिडीओ बाहेर आणले होते. अखेरीस कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव याने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण आला. त्यानंतर आता नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
