भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी केले असल्याचं उघड झालं आहे. सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचं यादी उघड झाली आहे. या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.
advertisement
सिन्नरमध्ये हार्डवेअर दुकान
एवढंच नाहीतर सिन्नरमध्ये अशोक खरातने एका हार्डवेअर दुकानामध्ये गुंतवणूक केल्याचं उघड झालं आहे. सिन्नर शिर्डी रस्त्यावर हार्डवेअरचं भव्य दुकान आहे. शिवसंकल्प हार्डवेअर असं या दुकानाचं नाव आहे. हे दुकान अशोक खरातच्या बायकोच्या नावावर आहे. हे दुकान त्याचा मेव्हणा सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातची कुठे मालमत्ता
अशोक खरातने नाशिकमध्ये मोठी मालमत्ता गोळा केली होती. सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव या परिसरात खरातने मोठी मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. शिर्डीतील ज्या भूखंडावर हा प्रकार घडला, तो जमिनीचा तुकडा अतिशय महागड्या ठिकाणी आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ही 'माया' जमवली गेली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
