बीड जिल्ह्यातील शिरूर कासारच्या तरुणाला इंस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे, धमकीखोराने आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी आपले कराचीमधील लोकेशनही शिरूरच्या तरुणाला पाठवले आहे. शिवाय, या कटात सहभागी होण्यासाठी 1 लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी 1 लाख देऊ, मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू, असे संशयिताने मेसेजद्वारे सांगितले.याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
धमकीचा मेसेजमध्ये काय?
पाकिस्तानी संशयिताने इंस्टाग्रामवर एक ऑडीओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओमध्ये पाकिस्तानी युजर म्हणतो, 'सोचके बताओ, हमारा साथ दो, मुंह खोल तुझे कितना अमाउंट चाहिये. हमें अयोध्या का मंदिर आरडीएक्ससे उड़ाना हैं. 50 बंदे चाहिये, आरडीएक्स पोहोच जायेगा.1 लाख रूपया मिल जाएगा, अगर तुम नही कर सकते तो किसी और को नबंर देदो, असा संवाद ऑडिओक्लिपमध्ये आहे.
याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच
संशयित युजर खरोखर पाकिस्तानचा आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल. इंस्टाग्राम वरून हे संदेश पाठवण्यात आले आहेत त्याचा तपास सुरू आहे नेमका हा संदेश कोणी पाठवला या संदर्भातही पोलीस तपासून सत्य समोर येईल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी सांगितलं. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
