मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, त्यानिमित्त राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सोमवारी सुट्टी मिळणार आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त देशभरात वेगवेगळ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
दुसरीकडे केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाचा होणार आहे. या दिवशी देशभरात सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती. अखेरीस केंद्र सरकारने 22 जानेवारीच्या दिवशी अर्धी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे अर्धा दिवस शासकीय कार्यालय सुरू राहणार आहे. केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रामध्ये सुट्टीचा उल्लेख केला आहे. संपूर्ण देश राममय झालाय. याच धर्तीवर 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पवित्र सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची म्हणजे दुपारी 2. 30 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
रामलल्लांच्या मूर्तीचं मुखदर्शन, अयोध्येतून पहिला Photo आला समोर
मंदिरात पोहोचली रामलल्लांची मूर्ती
दरम्यान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेआधी मूर्ती मंदिरात दाखल झाली आहे. रामलल्लांच्या मूर्तीचं मुखदर्शन झालं आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. रामललाची मूर्ती नेमकी दिसायला कशी असेल, ती पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आता रामलल्लांच्या मूर्तीवरचा पडदा उठला आहे.
