Ayodhya Ram Mandir : रामलल्लांच्या मूर्तीचं मुखदर्शन, अयोध्येतून पहिला Photo आला समोर
- Published by:Shreyas
Last Updated:
First Photo Of Lord Ram Idol in Ayodhya: अयोध्येमध्ये 22 तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याआधी रामलल्लांच्या मूर्तीचं मुखदर्शन झालं आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे.
अयोध्या : अयोध्येमध्ये 22 तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याआधी रामलल्लांच्या मूर्तीचं मुखदर्शन झालं आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. रामललाची मूर्ती नेमकी दिसायला कशी असेल, ती पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आता रामलल्लांच्या मूर्तीवरचा पडदा उठला आहे.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या वेळी मंदिराच्या गर्भगृहात पाच वर्षांच्या रामलल्लाचा 51 इंचाचा पुतळा स्थापित केला जाणार आहे. या मूर्तीचा रंग सावळा आहे. यात 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरुपातील श्रीराम कमळावर विराजमान होतील. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची आठ फूट आहे.
advertisement
हिंदू धर्मात बालपण हे साधारणतः पाच वर्षं वयापर्यंत मानलं जातं. त्यानंतर मूल सुबुद्ध मानलं जातं. चाणक्य तसंच अनेक विद्वानांच्या मते, पाच वर्ष वयापर्यंत मुलाची प्रत्येक चूक माफ केली जाते. कारण ते समजूतदार नसतं. या वयापर्यंत केवळ त्याला शिकवण्याचं काम केलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये देव आणि महान व्यक्तींच्या बाललीलांचा आनंद त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जास्त आला आहे, त्यामुळे रामलल्लांची मूर्ती 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरुपात दाखवण्यात आली आहे.
advertisement

काळा पाषाणच का?
view commentsरामलल्लाची मूर्ती शाळिग्राम पाषाणात घडवली आहे. सामान्यपणे हिंदूधर्मात देव-देवतांच्या मूर्ती या पाषाणातून घडवल्या जातात. हा दगड अत्यंत पवित्र मानला जातो. शाळिग्रामाचा रंग काळा असतो. तो गुळगुळीत आणि अंडाकृती असतो. धर्मग्रंथांनुसार, शाळिग्राम भगवान विष्णूचं दुसरं रुप आहे. हा एक जीवाश्म पाषाण आहे. शाळिग्राम हा सामान्यपणे पवित्र नदी किंवा तळं अथवा किनाऱ्यावरून घेतला जातो.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
Jan 19, 2024 4:15 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ayodhya Ram Mandir : रामलल्लांच्या मूर्तीचं मुखदर्शन, अयोध्येतून पहिला Photo आला समोर










