याच अनुषंगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, बाळासाहेब थोरात यांना सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर विचारले असता त्यांनी कोणताही आडपडदा ठेवला नाही. सत्यजीत तांबे निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा, आमची हरकत नाही
आमदार सत्यजीत तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, तो आता स्वतंत्र आहे. डॉ सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना सगळ्या पक्षातील लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे त्याने काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतो, तो सज्ञान आहे, त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही. त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा, आमची हरकत नसेल.
advertisement
आऊटगोईंगकडे जनतेचे लक्ष असते
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षांतर करीत आहेत. यावर थोरात म्हणाले, आऊटगोईंगकडे जनतेचे लक्ष असतं आणि अशाच वेळी नवे नेतृत्व तयार होत असते.
आमच्या दृष्टीने ही नवनिर्मितीची संधी आहे
बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांना सुनावले
अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले, अर्थमंत्र्यांकडून असे वक्तव्य येणे हे निश्चित शोभणारे नाही. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्यांच्या पाठीमागे उभे राहणे त्यांचे कर्तव्य आहे. फुकट किती द्यायचे म्हणता तर जनतेनं तुम्हाला मते दिली आहेत, सत्तेत गेल्यावर असे बोलणे योग्य नाही, असे थोरातांनी सुनावले. सत्ताधाऱ्यांना 2014 पासून निवडणुकीसाठी जुमले करण्याची सवय लागली आहे. त्यांची सवय मित्र पक्षालाही लागली आहे पण शेतकरी त्यांना माफ करणार नाही, असे थोरात म्हणाले.
