TRENDING:

बारामतीत पवार कुटुंबाची बैठक, रोहित पवारांनी दिली तारीख, दादांच्या अपघाताबद्दल गौप्यस्फोट करणार?

Last Updated:

आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबीयांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार असे पवार कुटुंबीयातील सदस्य होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबीयांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार असे पवार कुटुंबीयातील सदस्य होते. जवळपास पावणे दोन तास ही बैठक चालली. बैठक शरद पवारांनी स्वत: अजित दादांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. या बैठकीनंतर आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.
News18
News18
advertisement

पवार कुटुंबीयांच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचं स्मारक उभं राहावं, याबाबत चर्चा झाली. त्यांचं इथं म्यूझियम बनवावं, अशी देखील लोकांची मागणी आहे, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर देखील भाष्य केलं.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीबद्दल माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, "२८ जानेवारी पासून परिवारात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या दु:खद काळात आम्ही एखादी राजकीय भूमिका घेणं, हे आमच्यासाठी भावनिक दृष्टीकोनातून अवघड जातंय. ९ तारखेनंतर स्पष्टपणे आपल्याला या सगळ्या गोष्टींवर बोलता येईल."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

"शेवटी दादांची इच्छा काय होती? काय गोष्टी घडल्या? हे कुठंतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. विलीनीकरण होईल की नाही होईल, इतपत भाष्य करण्याएवढा मी मोठा नेता नाही. पण राजकीय दृष्टीकोनातून ज्या आरोपी प्रत्यारोपाच्या चर्चा आहेत. याचं कुठंतरी दु:ख वाटतं. अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्यांच्या मनात नेमकं काय? याची चर्चा कुणीच दुर्दैवाने करत नाही. चर्चा दुसरीकडेच कुठेतरी भरकटत चालली आहे, याला मोठ मोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरुप दिलंय, हे परिवारातील एक व्यक्ती म्हणून दु:ख वाटतं", असंही रोहित पवार म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीत पवार कुटुंबाची बैठक, रोहित पवारांनी दिली तारीख, दादांच्या अपघाताबद्दल गौप्यस्फोट करणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल