TRENDING:

प्रेमसंबंधाच्या संशयातून आक्रीत घडलं, 23 वर्षीय युवकाने संपवलं जीवन, बीडला हादरवणारी घटना!

Last Updated:

प्रेमसंबंधांच्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मांजरसुंबा परिसरात घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रेमसंबंधांच्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मांजरसुंबा परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (२३) असं मृत तरुणाचं नाव असून, प्रेयसीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे आणि चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर कोकाटे याचे नेकनूर जवळील एका गावातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची कुणकुण मुलीच्या नातेवाईकांना लागली होती. याच रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी ज्ञानेश्वरला गाठले. "तू आमच्या घराकडे का येतोस?" असा जाब विचारत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. केवळ मारहाण करून न थांबता, ज्ञानेश्वरवर चोरीचा खोटा आळही घालण्यात आला होता.

advertisement

मानसिक त्रासातून उचललं टोकाचं पाऊल

भररस्त्यात झालेली मारहाण आणि चोरीचा लावलेला खोटा आरोप यामुळे ज्ञानेश्वर प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. समाजात आपली बदनामी झाली आणि खोट्या आरोपांमुळे तो खचून गेला होता. याच वैफल्यातून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २३ वर्षीय तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

ज्ञानेश्वरच्या आत्महत्येला जबाबदार धरून त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे या चार जणांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रेमसंबंधाच्या संशयातून आक्रीत घडलं, 23 वर्षीय युवकाने संपवलं जीवन, बीडला हादरवणारी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल