राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या ठिकाणी प्रेमलता पारवे यांना तर भाजपाकडून डॉक्टर ज्योतीताई घुमरे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्मिताताई वाघमारे या उमेदवार आहेत. काँग्रेस, एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी यांनी देखील उमेदवार मैदानात उतरवले आहेत. गेल्या 35 वर्षापासून ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात राहिलेले आहे त्यामुळे आता यावेळी मतदार कोणाच्या सोबत राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
बीड शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक उद्याने, नाट्यगृह, विद्युत व्यवस्था या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल..
बीड नगरपरिषद
एकूण मतदार - 1, 80, 658
नगरसेवक एकूण - 52
महिला मतदार : 89, 968
पुरुष मतदार : 93,679
नगराध्यक्ष पदासाठी एकूण उमेदवार :
बीड नगरपालिकेत आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित व मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..
बीडमधील प्रमुख मुद्दे
- ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॉ योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी
- बीड शहरातील पाणीपुरवठ्याचा गेल्या अनेक वर्षांपासून न सुटलेला प्रश्न
- बीड शहरात स्वच्छतेचा अभाव
- बीडची ओळख ही मागास शहर व जिल्हा म्हणून असणे
- बीड शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था
- गेल्या काही वर्षात आलेला कोट्यावधींचा निधी परंतु अपूर्ण असलेली विकास कामे
