जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खरे तर लोकप्रतिनिधींनी काम करणे अपेक्षित असते. लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाऊन, जनता ज्याला कौल देईल, तो पुढची वाच वर्षे काम करत असतो. मात्र जनतेचा कौल पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवार म्हणून काय काय करावे लागते, हे कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. माजलगावमध्ये झालेल्या आढावा बैठकीत प्रकाश सोळंके बोलत होते. यावेळी आमदार विजयसिंह पंडित आणि जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आताही आपल्याला हेच करावं लागेल
सोळंके म्हणाले, माझ्या अनेक निवडणुका कार्यकर्ते म्हणून तुम्ही लढल्या आहेत. आता या निवडणुकीत देखील आपल्याला हे करावे लागणार आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा नवाच कानमंत्र राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना दिला.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या चित्रफितीचा समाज माध्यमांवर धुमाकूळ
आमदार प्रकाश सोळंके यांची चित्रफित समाज माध्यमांवर जोरदार पसरली असून यावरून जोरदार टीका देखील होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील बैठकीत सादर झालेल्याबी लावणीचा व्हिडिओ चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्या आमदाराचा हा निवडणूक जिंकण्याचा नवा कान मंत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
