जितेंद्र आव्हाड म्हणाले, इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली जी काही लफडी त्याच्यातली बीडचे प्रकरण एक आहे. संतोष देशमुख प्रकरण बीडच आहेत ते इलेक्शन फंडाचे आहेत. जी काही दोन कोटीची वसुली आहे. ती इलेक्शन फंडाची वसुली आहे.
तीन आरोपी फरार
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. ल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला आहे. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे.
advertisement
काय आहे खंडणीचे प्रकरण?
मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे यांनी फोन करत वाल्मीकअण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली. तसेच दुपारी सुदर्शन घुले याने कार्यालयात जात पुन्हा काम बंद करण्याची धमकी दिली. तसेच हातपाय तोडण्याची देखील धमकी दिली. पवनऊर्जा कंपनीकडून तब्बल 2 कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्याने वाल्मीक कराडने आपल्या फोनवरून पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसंदर्भात बोलणी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा खुलासा झाला आहे.
