TRENDING:

तासभर क्रिकेट खेळायला गेला अन् 12 दिवस झाले तरी परतलाच नाही, बीडच्या ‘त्या’ मुलासोबत काय घडलं?

Last Updated:

Beed News: सागर हा क्रिकेट खेळाचा चाहता असून, घरातून बाहेर पडताना त्याच्यासोबत क्रिकेटचे संपूर्ण साहित्य असलेली मोठी किट बॅग होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: क्रिकेट किटची बॅग घेऊन घराबाहेर पडलेला 17 वर्षीय मुलगा 12 दिवसांपासून घरी परतलेला नाही. सागर साईनाथ जाधव असे बीडमधील बेपत्ता असणाऱ्या मुलाचे नाव आहे. नगर रोडवरील पाठक मंगल कार्यालयासमोरील भागात राहणारा सागर 23 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलेला नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तासभर क्रिकेट खेळायला गेला अन् 12 दिवस झाले तरी परतलाच नाही, बीडच्या ‘त्या’ मुलासोबत काय घडलं?
तासभर क्रिकेट खेळायला गेला अन् 12 दिवस झाले तरी परतलाच नाही, बीडच्या ‘त्या’ मुलासोबत काय घडलं?
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा क्रिकेट खेळाचा चाहता असून, घरातून बाहेर पडताना त्याच्यासोबत क्रिकेटचे संपूर्ण साहित्य असलेली मोठी किट बॅग होती. त्यामुळे तो सरावासाठी किंवा मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी सुरुवातीला व्यक्त केला. मात्र संध्याकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Beed: हळदीच्या दिवशीच घडलं भयंकर, दुकानाला आग अन्.., बीडमध्ये हळहळ

advertisement

सागरचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी प्रथम नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ओळखीच्या ठिकाणी चौकशी केली. परिसरातील क्रिकेट मैदानांवर, मित्रांच्या घरी तसेच नेहमी वावरणाऱ्या ठिकाणी विचारपूस करूनही त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. दिवसेंदिवस वेळ जात असतानाही ठोस माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली आहे.

सागर बेपत्ता होऊन तब्बल बारा दिवस उलटले असून अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. मुलाच्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीय मानसिक तणावाखाली असून, नातेवाईक व परिचितांकडूनही काळजी व्यक्त केली जात आहे. परिसरात या घटनेबाबत चर्चा सुरू असून, नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, सागर साईनाथ जाधव हा कुणाला कुठेही आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ साईनाथ जाधव यांच्याशी 9011743222 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
तासभर क्रिकेट खेळायला गेला अन् 12 दिवस झाले तरी परतलाच नाही, बीडच्या ‘त्या’ मुलासोबत काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल