मयत तरुण यश ढाका याचं वाल्मीक कराड कनेक्शन समोर आलं आहे. यशचा एक जुना फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसोबत एका कार्यालयात उभा असल्याचं दिसत आहे. त्याचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला एडिट करून लावलेला डायलॉग मात्र आता सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
यश ढाका याच्या फोटोला एडिट करून "मैं अपने आप को पुलीस के हवाले कर रहा हू, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से.. मैं तो छूट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरे दोस्त, तेरा क्या होगा?" अशा प्रकारचा डायलॉग यशच्या फोटोला जोडण्यात आला आहे. त्याचा हा फोटो आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. या डायलॉगचं कनेक्शन थेट त्याच्या हत्येशी देखील जोडलं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड शहरात गुरुवारी रात्री यश देवेंद्र ढाका नावाच्या २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर त्याचा एकेकाळचा मित्र सूरज काटे याने केली. सूरजने यशच्या पोटात चाकू खुपसून त्याला रक्तबंबाळ केलं. हा हल्ला इतका भयंकर होता की यातच त्याचा जीव गेला. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.
महिन्याभरापूर्वी यश आणि सूरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केलीये. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. २२ वर्षीय यश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. ही घटना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.