उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात भाजपला आणखी बळ मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नाव लौकिक केलं. दिपावलीनंतर सुरेश कुटे यांचाही भाजपमध्ये अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी दोनदिवसांपूर्वीच नागपूर येथे भाजपात पक्ष प्रवेश केला. या प्रवेशानंतर सुरेश कुटे लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चेने पंकजांनंतर आता प्रीतम मुंडे यांनाही शह दिला जातोय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र. या सर्व चर्चेवर कुठे ग्रुपच्या व्यवस्थापक अर्चना कुटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलीही निवडणूक लढवणार नसून फक्त सामाजिक कार्यकर्त्यासाठी भाजपमध्ये प्रवेश घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
वाचा - शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांचा दिल्ली दौरा; मुनगंटीवार स्पष्टच बोलले
महिनाभरापूर्वी तिरूमला ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी
बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी टाकल्या होत्या. बुधवारी तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दीडशेहून अधिक आयकर अधिकारी, कर्मचारी बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयात पोचले आणि त्यांनी ही कारवाई सुरू केली. दिवसभर ही कारवाई सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर कुटे ग्रुपच्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आले आहे.