मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे.या प्रशिक्षण केंद्रात शेकडोहून अधिक तरूण तरूणी पोलीस बनण्याचं प्रशिक्षण घेतात. याच प्रशिक्षण केंद्रात शिकवणीला येणाऱ्या एका तरूणीकडून प्रशिक्षकानेच शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरूणी प्रचंड घाबरली होती.त्यामुळे सुत्रांनुसार तिने या घटनेची माहिती तिच्या मित्राला दिली होती.
पोलीस प्रशिक्षकानेच हा प्रकार केल्याने तरूणीचा मित्र देखील भडकला आणि त्याने थेट प्रशिक्षकाला जाब विचारला होता. पण प्रशिक्षकाने त्यालाही न जुमानता थेट जातीवाचक शिविगाळ केली होती. या घटनेनंतर पिडीत तरूणीच्या मित्राने थेट अड्याळ पोलीस ठाणे गाठत संबंधिक प्रशिक्षकाविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
advertisement
या तक्रारीनंतर पोलिसांनी नितेश हिवरकर (३९) या प्रशिक्षकाला अटक केली होती. नितेश हा सोनेगाव ठाणे ता. पवनी जि भंडाऱ्यात राहणार आहे. यानंतर पोलिसांनी ॲकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध ७५ (२), ३५१, ३५२(२) सहकलम ३(१) (आर )(एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतायत.