शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरावर आक्षेप घेत राइट टू रिप्लाय अंतर्गत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमांचा दाखला देत ही परवानगी नाकारली. नार्वेकरांच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले. त्याच दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिशेने हातवारे केल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले.
advertisement
विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाल्याने कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव कमालीचे आक्रमक झाले. त्यांनी अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.
Bhaskar Jadhav : जबर चिडले, कोणावर भडकले, सभागृहातनंतर बाहेर येताच भास्कर जाधव काय म्हणाले?
अध्यक्षांकडूनच नियमांची पायमल्ली...
विधानसभा अध्यक्ष हे पक्षपातीपणा करत असून त्यांनी आता सरकार बरखास्त करावे आणि स्वत: सरकार चालवावे असे जाधव यांनी म्हटले. नियम 293 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील इतर मुद्यांवर भाष्य केलेच नाही. फक्त मुंबईवरच चर्चा केली. अध्यक्ष नियमांचा दाखला देतात पण नियमानुसार 4-5 लक्षवेधी घेण्याचा नियम कसा डावलतात, असा सवालही जाधवांनी उपस्थित केला.