महापौर पदासाठी काँग्रेसकडून तारिक मोमिन, हे नावे समोर येत आहे. तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे माजी उपमहापौर इमरान खान यांची मुलगी अॅड. ईशा इमरान खान यांच्या नावावर उपमहापौर पदासाठी एकमत झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.
महापौरपदासाठी मॅजिक फिगर ४६ आहे. काँग्रेसचे ३० नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे १२ नगरसेवक मिळून ४२ नगरसेवक होत आहेत. त्यांना समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल, असे निश्चित झाले आहे. तिन्ही पक्षांच्या बळावर काँग्रेसचे महापौर बसतील तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा उपमहापौर बसवण्याची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
advertisement
भिवंडीचे पक्षीय बलाबल कसे आहे?
भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेले नाहीये. काँग्रेस ३०, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १२, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी आणि अपक्ष ४ असे भिवंडीतील पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षाच्या विरोधात आमदार रईस शेख यांनी बंड केले होते. आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला उघड मदत केली होती.
